Monday, 31 July 2017

Quote-Unquote@01.08.17

सोनपहाट                       

 

O holy virgin! clad in purest white,

Unlock heav'n's golden gates, and issue forth;

Awake the dawn that sleeps in heaven; let light

Rise from the chambers of the east, and bring

The honey'd dew that cometh on waking day.

O radiant morning, salute the sun

Rous'd like a huntsman to the chase, and with

Thy buskin'd feet appear upon our hills.” 

― William Blake / To Morning

परमेश्वराच्या कृपाप्रसादाने प्रत्येक मानवाच्या जीवनात येणारी पहाट किती रम्य असते त्या पहाटेचे महत्व विचारी मानवाला किती मोलाचे वाटू शकते हे एखाद्या प्रतिभावान आणि श्रेष्ठ दर्जाच्या कवीच्या कल्पनाविलासामुळे त्याच्या शब्दसामर्थ्यामुळे आपल्याला प्रभावीपणे कळू शकते. पहाटेच्या वेळी पूर्व दिशेला उगविणारे सूर्यबिंब त्यामुळे संवेदशील मानवाच्या जीवनात प्रवेशित होणारा खराखुरा प्रकाश विलीयम ब्लेक या एका संवेदनशील कवीच्या लेखणीतून एका छोट्याश्या परंतू अतिशय सुरेख कवीतेद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतो तेव्हा आपले मन देखील त्या काव्यप्रतिभेच्या साक्षात्कारामुळे उजळून निघते. विलीयम ब्लेकचे शब्दसामर्थ्य त्याच्या कवीमनाचा साधेपणा याचा सुरेख संगम झालेला आपल्याला आढळतो. पहाटेचे इतके सुरेल वर्णन क्वचितच वाचायला मिळते. पवित्र पहाट जी स्वर्गामधे झोपलेली असते तिला हलकेच जाग येते. पांढरी शुभ्र वस्त्रे परीधान केलेली अशी सुंदर पहाट जेव्हा पृथ्वीतलावर येण्यासाठी हळू हळू चालू लागते तेव्हा स्वर्गाची सोनेरी दारे उघडली जातात आणि सुर्यगोलाच्या रुपाने ती मधुकण बनून  पृथ्वीवरील प्रत्येक रंध्रामधे सामावून जाते तेव्हा तो प्रत्येक रंध्र उजळून निघतो आणि सबंध धरतीला प्रकाशाने न्हाऊन काढणारे ते सूर्यबिंब पूर्वेच्या टेकडीवर अवतरते तेव्हा जीवनाच्या अस्तित्वाचा पुरावाच जणू प्रत्येकाला प्राप्त होतो. तम निशेचा दूर सारुन तेजस्वी किरणे विचारी मानवाला एक नवा दिवस देतातमनापासून जगण्यासाठी. एका नवा दिवस आलेला असतो प्रत्येकाच्या मनाला एक नवा दिलासा देण्यासाठीतो प्रकाश रुपी परमेश्वर त्याचाच अंश असलेल्या प्रत्येक मानवाला सांगत असतो… 

मित्रा, आज एक नवा दिवस मी तुला दिलाय.. एक अप्रतिम दिवस ज्या दिवसाचे फार मोठे महत्व आहे. प्राण्यांपेक्षा मी तुला वेगळे बनविले ते केवळ एका गोष्टीमुळे..ती गोष्ट म्हणजे स्वतःचा विकास करणारा संवेदनांसह जगण्याची क्षमता निर्माण करणारा मेंदू मी तुला प्रदान केला. तुला सौंदर्य कळू शकते आणि त्या क्षमतेमुळे तू स्वतःसोबतच इतरांचेही आयुष्य सुंदर बनवू शकतोम्हणूनच मी तुला एक सुंदर दिवस दिलायमनापासून जगण्यासाठी या जगाच्या सुंदरतेमधे भर घालण्यासाठीएक सुंदर दिवसआज तू प्रत्येक क्षणी केवळ सकारात्मक विचार करणार आहेसआयुष्याला जसे मिळाले तसे स्विकारुन त्याबद्दल ऐरवी करीत असलेली तक्रार आज तू करणार नाहीसआज या रम्य पहाटेपासूनच तुझ्या चेहेऱ्यावर सुंदर हास्य विलसत राहील ज्यामुळे तुझ्या मनाचा तेजस्वी प्रकाश तुझ्या चेहेऱ्यावर उमटलेला लोकांना दिसेलआज या रम्य दिवशी तुझी भाषा तुझ्या सहवासातील कुणालाही दुखविणारी नसेल याची काळजी घेएरवी तुझ्या भाषेमधे जमेल तेवढा तीव्रपणा आणून तू तुझे महत्व वाढविण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात अनेकांचा अपमान करीत सुटतोतुझ्या जवळच्या प्रेमाच्या लोकांनाही तू वाटेल तसा बोलतोसआज त्यांच्याशी जरा प्रेमाने बोलून बघकिती पटीने प्रेम परत मिळू शकते याची जाणीव तुला होईलआजचा हा सुंदर दिवस कुणालातरी नवे काहीतरी सांगण्यासाठी व्यतीत करनाविन्याची कास धरुन कालच्या दिवसापेक्षा आजचा दिवस जास्त कल्पकतेने तुला जगता येईल का याचा प्रयत्न कर.. आजच्या या दिवशी तुझ्या जीवनाला खरा खुरा आधार देणारे, मानसिकदृष्ट्या तुला सांभाळणारे, तुझ्या एका हाकेसरशी तुझ्या सोबत सक्षमतेने उभे राहणारे आणि तुझ्यावर मनापासून निर्व्याज प्रेम करणारे किती लोक आहे याचा जरासा विचार करत्या लोकांनी तुझ्यासाठी केलेल्या आणि करीत असलेल्या त्यागाचा केवळ विचार जरी केलास तरी तुझा दिवस सत्कारणी लागला असे म्हणता येईलआजच्या या सोनेरी दिवशी प्रत्यक्ष सोने खरेदी केले नाहीस तरी चालेल परंतू तुझ्या घरात आनंदाने बागडणाऱ्या मुलांच्या सहवासात काही सोनेरी क्षण तुला घालविता येतील का ते बघत्यांना तुझ्याशी काय बोलायचे आहे ते जरा त्यांच्या पातळीवर जाऊन समजून घेतुझ्या घरी एका बाजूच्या खोलीत तुझे आई बाबा दिवसभर चातकासारखी तुझी वाट बघत बसले असतातआज मी तुझ्या ओंजळीत टाकलेल्या प्रकाशाची काही किरणे त्यांच्या सुरकुतलेल्या हातांच्या ओंजळीत नेऊन टाकजरा वेळ बस त्यांच्याजवळ..विचार त्यांना त्यांचे आयुष्य कसे जाते आहे. दोन वेळा जेवण आणि आजारी पडल्यास दवाखाना एव्हडे केले म्हणजे संपत नाही रे त्यांच्या प्रतीचे कर्तव्यआज बोलून तर बघ त्यांच्याशीकाही आनंदाचे त्यांनाही सांगत्यांचेही काही ऐकआजच्या या सुरेल दिवशी सायंकाळी घरीच थांब रेनको जाऊस त्या पार्टीला जेथे दारुच्या ग्लासमधे बर्फाचे खडे ओतत तू आनंद मिळविण्याच्या आभासी क्षणांना कवटाळतो परंतू आपल्या मुलांसोबत सायंकाळी एकत्रीतपणे रामरक्षा म्हणण्याचे किंवा घरातील सर्वांनी सोबत बसून धमाल गप्पा करीत जेवण्याचे अनेक सुवर्ण क्षण गमावतो आहेस याचे तुला भानही नाहीआजच्या या दिवशी तुला सोपविण्यात आलेले काम अतिशय प्रमाणिकपणे करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे त्यामुळे त्या कामाचे निर्वहन करताना त्याला ओझे वाटू देता ते तुझे तुझ्या मातृभूमीप्रती कर्तव्य आहे या भावनेतून  पूर्ण करावेस.. दिलेले कार्य पूर्ण करताना देहभान विसरुन तू ते करावेसतू शिक्षक असशील तर विद्यार्थ्यांना आजचा तुझा वर्ग हा सर्वोत्तम वाटावातुझ्या अध्यापन कौशल्याने पहाटे तुला प्राप्त झालेल्या प्रकाशाप्रमाणे तुझ्या विद्यार्थ्यांचे देखील चेहेरे उजळून निघावेतू डॉक्टर असशील तर तू तुझ्याकडे आलेल्या रुग्णाला तुझ्याठायी असलेल्या परमेश्वराच्या अंशाची जाणीव व्यवहारापेक्षा जास्त व्हावी याची काळजी घ्यावीतू बँकर असशील तर काचेच्या पलीकडे असलेल्या माणसांना माणसे समजूनच माणसांप्रमाणे तू व्यवहार करावात्यांना गरजवंत समजून मानहानीची वागणूक देऊ नये

या अत्यंत सुदिनी माझ्यातील सत्वांचा समुच्चय असलेल्या प्रकाशाने व्याप्त असा प्रसाद मी तुला देतो आहे. या प्रसादाचा स्विकार तू उच्च दर्जाच्या प्रसादभावनेनेच करावा जेणे करुन तुला तो जसा मिळालाय तसा स्विकारता येईल, त्याबद्दल तर्क वितर्क करता येणार नाहीत सोबतच तो प्रसाद तुला अनेकांसोबत वाटून त्याचा आनंद द्विगुणित करता येईलहे मानवा! तुझ्यासाठी मी आणत असलेला प्रत्येक दिवस असाच असतो..त्या प्रत्येक सोनेरी प्रकाशाने नटलेल्या दिवसाचे जर तू सोने करु शकलास तरविचार करतुझे सारे जीवनच सुखमय होईलप्रत्येक नवा दिवस तुझ्यासाठी नवतेचा ध्यास निर्माण करणारा असेल ज्याच्या आधारे तूला स्वतःसाठी इतरांसाठीही अनेक सुंदर क्षण गुंफता येतील

चला मंडळी.. विलीयम ब्लेकच्या काव्याचा आधार घेऊन स्वर्गातून धवलवस्त्रे लेवून आपल्या जीवनाला समृद्ध करण्यासाठी येणाऱ्या पहाटेला भेटूयातरोज मनापासून!!



Quote-Unquote@05.09.17 (Last Article)

   आधुनिक यंत्रजीवन                      “What shall I do now? What shall I do?” “I shall rush out as I am, and walk the street “With m...